अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषद शाळेजवळील तांदळी रस्त्यावर प्रांत विभागाच्या पथकाने वाळूने भरलेले टॅक्टर पकडले असून वाहन मारवड पोलीसात जप्त करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषद शाळेजवळील तांदळी रस्त्यावरून अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर नेत असतांना अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रूपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने पकडले. हे ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई  मंडळ अधिकारी सुरेश आर. बोरसे, तलाठी निंब/शहापुर जितेंद्र जोगी, तलाठी मारवड  मनोहर भावसार,  विकास परदेशी तलाठी जैतपीर, कोतवाल शहापुर वासुदेव तिरमले, कोतवाल कळमसरे आधार सोनवणे यांनी केली.

Protected Content