Home Cities चाळीसगाव शेठ ना.बं.वाचनालयात उद्या वॉटर कुलरचे लोकार्पण

शेठ ना.बं.वाचनालयात उद्या वॉटर कुलरचे लोकार्पण

0
181
download 3
download 3


download 3

चाळीसगाव (प्रतिनिधी) स्व. मधुकर मल्हारी धामणे (श्री सिद्धिविनायक पेंट्स चाळीसगाव) यांचे सुपुत्र प्रवीण व स्वप्नील धामणे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या वाचकांसाठी थंड पाण्याचे कुलर सप्रेम भेट दिले आहे.

 

सदर कुलरचा लोकार्पण समारंभ रविवारी (दि १६) सायंकाळी ६.३० वाजता वाचनालयात आयोजित केला आहे तरी वाचक, सभासदांनी व जनतेने धामणे कुटुंबाच्या दातृत्वाचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. हेमांगी पूर्णपात्रे , कार्यवाह प्रा.दीपक शुक्ल यांनी केले आहे.


Protected Content

Play sound