Home क्राईम नवजात अभ्रक मुलीच्या तोंडात तंबाखू टाकून केला खून

नवजात अभ्रक मुलीच्या तोंडात तंबाखू टाकून केला खून

0
118

पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन मुले असताना तिसरी ही मुलगी झाली म्हणून बापाने नवजात अभ्रक मुलीला स्वतःजवळची तंबाखू तोंडात टाकून खून केल्याचा खळबळजनक  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील हरी नगर तांडा येथे ३० वर्षीय तरुण हा आपल्या पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला आहे.  यापूर्वी त्याला दोन मुली झाल्या दरम्यान तिसऱ्या अपत्य ही मुलगीच झाल्याचा राग मनात ठेवून नवजात अभ्रक मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला झोक्यात टाकून ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे मृतदेह गावाचे शेजारी असलेल्या नाल्याजवळ खड्ड्यात पूरून टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आली आहे. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.


Protected Content

Play sound