जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। तरसोद फाट्याजवळील सरस्वती फोर्ड शोरूम समोर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील वृध्द आईसह मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हसीनाबी अब्दुल हबीब (वय-६३) रा. भुसावळ या वृध्द महिला पती व मुलांसह वास्तव्याला आहे. त्या आजारी आल्याने सोमवारी ११ सप्टेंबर रोजी त्यांचा मुलगा सैय्यद हैदर अली (वय-४०) यांच्यासोबत दुचाकीने जळगावातील डॉ. सतिष पाटील यांच्याकडे आलेल्या होता. त्यानंतर डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर हसीनाबी या मुलगा सैय्यद हैदर अली याच्या सोबत भुसावळला जाण्यासाठी दुचाकीने निघाल्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तरसोद रोडवरील सरस्वती फोर्ड शोरूम जवळून जात असतांना भुसावळकडून जळगाव कडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात माय लेक दोन्ही जखमी झाले. त्यांता तातडीने नागरीकांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.