जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव – चाळीसगांव चांदवड हा राज्य मार्ग गेला असून सदर कार्यक्रमाचे दिवशी जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने पर्यायी मार्गावरुन वळविण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले आहेत.
जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहनांकरिता 12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजता पर्यंत पर्यायी वाहतूक मार्ग वळविण्यात आला आहे.
जळगांव येथून पाचोरा मार्ग चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने हे पाचोरा मागे न जाता जळगांव –एरंडोल- कासोदा- भडगाव मार्ग चाळीसगांवकडे जातील. चाळीसगांव येथून पाचोरा मार्ग जळगावकडे जाणारी अवजड वाहने हे चाळीसगांव- भडगांव- कासोदा एरंडोल मागे जळगांव कडे जातील.