Home Cities पाचोरा पाठीच्या विकारांसाठी विघ्नहर्तामध्ये डॉ. सुबोध बोरोले यांची सेवा

पाठीच्या विकारांसाठी विघ्नहर्तामध्ये डॉ. सुबोध बोरोले यांची सेवा

0
108


spine surgery

पाचोरा प्रतिनिधी । स्पाईन सर्जरी व पाठीच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. सुबोध बोरोले हे रविवारी येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये येत आहेत.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे पाठीचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात प्राथमिक स्वरूपातील स्पाँडीलायटीसपासून ते मणक्याच्या सर्जरीसारख्या गंभीर प्रकारापर्यंतच्या विकारांचा समावेश आहे. आजवर या विकारांसाठी पाचोरा आणि परिसरातील रूग्णांना जळगाव येथे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तथापि, आता येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये मध्यप्रदेशातल्या बर्‍हाणपूर येथील ख्यातनाम ऑल इज वेल हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टर सुबोध बोरोले (एमसीएम- स्पाईन सर्जरी) यांची सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ते रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या कालखंडात रूग्णांची तपासणी करणार आहेत. यामुळे परिसरातील रूग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड यांनी केले आहे.

डॉ. सुबोध बोरोले यांची अपॉइंटमेंट आणि अन्य माहितीसाठी ०२५९६-२४४००४/२४४००५ या क्रमांकावर रूग्ण संपर्क साधू शकतात.


Protected Content

Play sound