काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे भुसावळात जोरदार स्वागत

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहरातील महात्मागांधी पुतळ्याजवळ आगमन झाले. यावेळी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

 

सत्तेचा वापर करून जालन्यात मराठा समाजावर लाठीचार्ज या भाजपवाल्यांनी केला- काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची सरकारवर टिका केल्याचे पहायला मिळाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिका अर्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. चोपडा तालुक्यातून उमपदेव इथून ही यात्रेला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत वेगवेगळ्यात तालुक्यांमध्ये जावून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी जनतेचे सर्वसामान्य प्रश्न व अडचणी समजून घेतले जात आहे.  जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.  देशातील महागाई, शेतकऱ्यांवरील अन्याय, मराठा समाजावर लाठीचार्ज या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह जनतून दिसून येत आहे.  अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बोलतांना दिली.  भुसावळ शहरातून संवाद यात्रा पुढे साकेगावकडे रवाना झाली.

Protected Content