चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीसह मराठा समाजाला न्याय देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील आंतरवाली सराटी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली असून ती अतिशय दुर्दैवी व संतापजनक आहे. मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर समाजहिताचा विषय आहे, सनदशीर मार्गाने चार दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात माता-भगिनींसह तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मात्र शुक्रवारी अचानक पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला ही घटना मानव हिताला न शोभणारी आहे.या घटनेचा आम्ही चाळीसगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक निषेध करत आहोत .तसेच मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती की, जालना येथील मराठा बांधवावर झालेल्या अमानुष लाठीचार्ज तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, तसेच तात्काळ मराठा समाजबांधवांना आरक्षण मंजूर करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राहुल पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, संदीप भाऊ राठोड युवासेना उपजिल्हाप्रमुख, प्रतिभा पवार जिल्हा संघटक, अनिता शिंदे उपजिल्हाप्रमुख, मनीषा महाजन तालुकाप्रमुख, सुवर्णा राजपूत शहर प्रमुख, सागर चौधरी युवासेना शहरप्रमुख, महेंद्र पाटील युवासेना तालुकाप्रमुख,भाऊसाहेब सोमवंशी, विनोद जाधव, शुभम राठोड,परमेश्वर रावते, रत्ना पाटील, प्रतिभा महाजन, सीमा पवार, विशाल धनगर, दारासिंग राठोड दिनेश कासार सागर पाटील, भाऊसाहेब रावते, मनीष सैंदाणे, गणेश साळुंखे, साहिल पाटील, आबा पाटील, संजय राठोड, मुकुंद गोसावी, सुरज जाधव, आदी पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.