नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो लवकरच अवकाश स्थानकाची निर्मिती करणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे.
भारत लवकरच अवकाश स्थानक निर्मिती करणार असल्याची माहिती के. सिवन यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि चीनचे अवकाश स्थानक कार्यरत आहेत. यानंतर भारत स्वत:चे स्थानक निर्मित करत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. यामुळे अवकाश संशोधाच्या क्षेत्रातील भारताचा लौकीक अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.