भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अमर वाईन दुकानासमोर दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला शिवीगाळ करत काचेची बाटली डोक्यावर मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद अझरुद्दीन शेख मोईनोदिन (वय-३०) रा. मुस्लिम कॉलनी भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील अमरवाईन दुकानासमोर उभा होता. त्यावेळी कृष्णा मोहन लोहार रा.रिंग रोड, महाकाल चौक, भुसावळ हा त्या ठिकाणी आला. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन शेख मोईनोदिन हा त्या ठिकाणी उभा असल्याचे पाहून कृष्णा लोहार याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला नकार दिल्याने याचा राग येऊन कृष्णा लोहार याने हातातील काचेची बाटली मोहम्मद याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेत मोहम्मद याला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी कृष्णा मोहन लोहार यांच्या विरोधात सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अन्वर दिलावर शेख करीत आहे.