Home क्राईम हटकल्याचा आला राग, तरूणावर फिरकावला दगड

हटकल्याचा आला राग, तरूणावर फिरकावला दगड


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे एकाला किरकोळ कारणावरून दगड डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश राजेशहरी तळेले (वय-३९) रा. किन्ही ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीला गणेश तळेले यांनी हटकले. याचा राग आल्याने अनोळखी व्यक्तीने हातात दगड घेवून गणेश तळेलेच्या अंगावर फिरकावला. त्यात दगड डोक्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गणेश तळेले याने भुसावळ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound