चोपडा (प्रतिनिधी)। पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटना आणि चुंचाळे येथील महाजन बंधु यांच्या सहकार्याने मामलदे गावाजवळील कृष्णापूर मामलदे रस्त्यावरील पांढरी विहीर जवळच्या नालाखोलीकरण कामाचे शुभारंभ माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी ट्रस्टचे उपाध्यक्ष बंडू नाना देसाई, आशिषभाई गुजराथी, राजेश सराफ, भारतीय जैन संघटनेचे विभागिय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तालुकाध्यक्ष क्षितिज चोरडीया, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, राष्ट्रवादीचे युवा जिल्हाअध्यक्ष ललित बागुल, अरविंद मानकरी, विनोद देशमुख आदी उपस्थित होते
चंद्रहासभाई गुजराथी यांनी सांगितले की, पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. आता सामाजिक संस्था, नेते, ट्रस्ट, हे जागृत होण्यापेक्षा प्रत्येक माणसाने जागृत होणे आवश्यक आहे. ७०० ते ८०० फूट लांब आणि २० ते २५ फूट खोल करून या नाल्यात कोट्यवधी लीटर पाणी साठवण होऊ शकते. परिसरातील दिड ते दोन किलोमीटरपर्यंत हे पाणी जिरवण होऊ शकते यासाठी अवधूत महाजन, बालमुकुंद महाजन या दोघे बंधुनी पुढाकार घेऊन काही प्रमाणात आर्थिक सहयोग करून नाला खोलीकरणंला सुरुवात केली आहे. यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा व अशी जागृता सर्व जनतेत आली तर पुढील २ ते ३ वर्षांत पाण्याची समस्या निराकरण होईल, असे गुजराथी यांनी सांगितले. यावेळी भरत इंगळे, पोलीस पाटील, सरपंच आदी गावातील अनेक ग्रामस्थ हजर होते.