पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम निसर्गकवि तथा गीतकार कविवर्य ना. धों. महानोर यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला.
पुणे येथील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू असतांना ना. धों. महानेर ( वय ८१) यांचे आज निधन झाल्याने साहित्य क्षेत्र शोकसागरात बुडून गेलेले आहे. खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पळासखेडा येथील रहिवासी असलेले महानोर हे मराठी साहित्यातील एक मातब्बर असे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. पद्मश्री आणि साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. तर, त्यांनी कविता, गीत, ललीत लेखन आदी क्षेत्रांमध्ये आपल्या गुणवत्तेचा मापदंड प्रस्थापित केला होता.
रानातल्या कविता, पावसाळी कविता आदी त्यांचे कविता संग्रह लोकप्रिय झालेले आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची गाणी देखील लिहली. यात जैत रे जैत, सर्जा, अजिंठा, एक होता विदूषक आदींसारख्या चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी गाणी ही अविट गोडीची ओळखली जातात. तर विधानपरिषदेचे आमदार म्हणून देखील त्यांनी सहा वर्षे कामगिरी पाहिली होती.
मूळचे पळासखेडा येथील रहिवासी असलेल्या ना. धों. महानोर यांच्या आयुष्यातील मोठा कालखंड हा जळगावात व्यतीत झाला आहे. जळगावात त्यांचे निवासदेखील आहे. कै. मोठेभाऊ अर्थात भवरलाल जैन यांच्यासोबत त्यांचा विलक्षण भावबंध होता, तो आजवर जैन कुटुंबासोबत जोडलेला आहे. बहिणाबाई चौधरी आणि बालकवि यांचा समृध्द वारसा पुढे चालवणारा कवि म्हणून त्यांची ख्यात होती. अशा या मान्यवर व्यक्तीमत्वाला लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे आदरांजली.