धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ३४ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना भादली रेल्वे स्टेशनच्या जवळ घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ जुलै रोजी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  सतीश पांडुरंग सोनवणे (३४, रा. चोपडा) असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी २८ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी जात असताना जळगाव ते भादली दरम्यान तिच्या समोर आलेल्या एका तरुणाला धडक बसली. त्यानंतर त्याला ट्रॅकमॅनने बाजूला केले. या विषयी लोको पायलटने माहिती दिली. त्यानुसार परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी पोहेकॉ बापू कोळी, ज्ञानेश्वर कोळी यांना घटनास्थळी पाठविले. या विषयी मयताचे नातेवाईक गणेश रमेश महाजन (रा. वृंदावन कॉलनी, जळगाव) यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन ओळख पटविली असता मयत हा त्यांचा शालक सतीश सोनवणे असल्याची खात्री झाली.

 

हा तरुण रेल्वे रुळ ओलांडून कोठे जात होता, या विषयी माहिती मिळू शकली नाही. त्याने आत्महत्या केली की काय, याविषयीदेखील तपास सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहेत.

Protected Content