Home क्राईम पैशांची मागणी करत विवाहितेला मारहाण

पैशांची मागणी करत विवाहितेला मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील माहेरवाशीन असलेल्या विवाहितेला पैशांची मागणी करीत तीचा छळ सुरु केला. तसेच विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर तीच्या पतीला “आत्ताच तलका द्यावा लागेल आम्ही त्याच दुसर लग्न करणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील भारत नगरातील माहेर असलेल्या हिना शेख साजीद शेख यांचा विवाह यावल येथील शेख साजीद शेख हनिफ यांच्यासोबत झाला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या माहेरी येवून त्यांना पैशांची मागणी केली. त्यांच्या आईने पैसे देण्यास नकार दिला असता, त्यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच विवाहितेचे दीर व नणंदोई यांनी तुम्हे अभी के अभी तलाक देना पडेगा हम साजीद की दुसरी शादी करेंगे असे म्हणत विवाहितेसोबत पुन्हा वाद घालून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेला सासरच्या मंडळींपासून धोका असल्याने विवाहिता सासरी जाण्यास तयार नाही. याप्रकरणी त्यांनी महिला सहाय्यक कक्षात अर्ज दिला होता. त्यांच्यातील वाद आपापसात न मिटल्यामुळे त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पतीशेख साजीद शेख हनिफ, सासू नसीम शाजीद हनिफ, दीर शेख आसिफ शेख हनिफ, मोठी नणंद अजुंमबी नाजीम शेख, नाजीम शेख गयास, तब्युम रिजवान मलीक, रिजवान मलीक, रेहाना शेख रफिक, मोहसिन शेख रफिक सर्व रा. आक्सा नगर यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound