जळगाव (प्रतिनिधी) प्रवाशी रिक्षाला समोरून येणाऱ्या मालवाहू छोटा हत्तीने जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह अन्य दोनजण गंभीर जखमी झाले असून दोघांना जिल्हा रुग्णालयात तर एकाला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संजय गौतम सोनवणे (वय २२) राहणार सुप्रीम कॉलनी हा रिक्षा क्रमांक एमएच १९ व्ही ८९२० रात्री बारा वाजता स्टेशनवर जाण्यासाठी दोन प्रवाशांना बसविले. सोबत त्याचा मित्र तथा रिक्षाचा मालक अनिकेत संजय राजपूत (वय १९ रा. सुप्रीम कॉलनी परिसरात रात्री १२.३० वाजता जात असताना हॉ टेल काशिनाथ लॉजजवळ समोरून येणार्या अज्ञात मालवाहू हत्ती गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले. त्यातील संजय सोनवणे व अनिकेत राजपूत या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर एकाला ( नाव पूर्ण माहीत नाही) शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अज्ञात वाहनधारक विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेका करीत आहे.