जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील मोबाईल दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विनीत कैलासकुमार अहुजा (वय-३१) रा. गणेश नगर, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे शहरातील गोलाणी मार्केट परिसरात श्री एसएसडी नावाचे मोबाईल दुकान आहे. १८ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे गच्चीवरील लोखंडी गेटचे कूलूप तोडून गॅलरीतून प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानांची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी दुकान मालक विनीत अहुजा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.



