यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभूर्णी गावात २४ वर्षीय तरूण हा नोकरीसाठी जात असल्याचे सांगून गेल्या वीस दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. आईने दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पियुष यशवंत चौधरी (वय-२४) रा. डांभूर्णी ता. यावल असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पियुष चौधरी हा आपल्या आईसह यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे वास्तव्याला आहे. २८ जून रोजी पियूष हा आईला सांगून नाशिक येथे नोकरीचा कॉल आला असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. परंतू गेल्या २० दिवसांपासून त्याचा कोणतीही माहिती किंवा घरी आलेला नाही. त्यानंतर पियुशची आई सुजाता चौधरी यांनी देखील त्याचा सर्वत्र शोध घेतला कुठलाच पत्ता मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे