यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातीत मोहराळा गावात झालेल्या महापुरुष ङॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्ति कड्डन विटंबणा करण्यात आल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून , गावात तणावपुर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे समाज बांधवांनी शांता राखण्याचे आवाहन निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आंनद बाविस्कर यांनी केले आहे.
महापुरूष डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबणाच्या घटनेची माहिती मिळताच निळे निशान सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी घटनेच्या पार्श्वभुमीवर फैजपुरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे आणी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांची यावल येथे भेट घेतली. आपल्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत मोहराळा गावाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी मोहराळा ग्रामपंचायतच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत गावातील सर्व समाज बांधवांची भेट घेत त्यांचे विटंबणा घटनेच्या बाबत सविस्तर माहीती जाणुन घेतली. यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन व सुचना देवुन कठल्याही भावनेच्या व अफवांच्या आहारी जावू नये व गावात शांतता ठेवावी, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कायद्याशीर न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावे असे आवाहन केले. मोहराळा ग्रामपंचायतच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आनंद बाविस्कर ,संघटनेचे तालुका अध्यक्ष वितास तायडे , युवकचे तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल, ईकबाल तडवी यांच्यासह ग्रामसेवक राजु महाजन ईतर पदधिकारी उपस्थित होते .