धरणगाव शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याची घटना सोमवारी ३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धरणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व नातेवाईकांसोबत राहत आहे. सोमवारी ३ जुलै रोजी रात्री २ वाजता घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिचे अपहरण केले. हा प्रकार तिच्या आईसह घरातील समजल्यानंतर त्यांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. परंतू मुलीची कुठेही काहीही माहिती मिळाली नाही, अखेर सोमवारी ३ जुलै रोजी रात्री ९ वाजता पिडीत मुलीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरेाधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

Protected Content