जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औषधी आणण्यासाठी जात असलेल्या महिलेची छेडखानी करीत त्यांना विरोध केल्याने टवाळखोरांकडून त्यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी २९ जून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिरणा टाकी परिसरात घडली. याप्रकरणी शनिवारी १ जुलै रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात विवाहिता वास्तव्यास असून गुरुवारी २९ जून रोजी महिला पतीसह औषधी घेण्यासाठी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिरणा टाकी परिसरातील मेडीकलवर जात होते. यावेळी विवाहितेच्या पतीच्या ओळखीचे असलेले किरण जोहरे, जितेंद्र सोनवणे, राज पवार व दीपक अहिरे हे सिगरेट पीत बसलेले होते. त्यांनी विवाहितेकडे बघून शिट्ट्या वाजवित विवाहितेची छेड काढली. याप्रसंगी राज पवार याने विवाहीतेची छेड काढत असल्याने विवाहितेच्या पतीने त्याला हटकले असता, त्याने विवाहितेच्या पतीला शिविगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी देखील मारहाण केली.
पोलिसात तक्रार दिली तर जिवंत ठेवणार नाही
मारहाण करीत असतांना चौघांनी आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. तर तुम्हाला जीवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या दाम्पत्य घरी निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार किरण अहिरे, जितेंद्र सोनवणे, दीपक अहिरे, राज पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.