जळगाव प्रतिनिधी । महिलांविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह विधान करणार्याविरूध्द जिल्हा रूग्णालयात महिला संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत त्याला चोपण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून संशयितांना कारागृहात हलविले.
याबाबत वृत्त असे की, सोशल मीडियात एका राजकीय नेत्याच्या वैयक्तीक चारित्र्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली असून यात महिलांचा अवमान करण्यात आला आहे. यामुळे संबंधीतांविरूध्द कालच तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून यापैकी नितीन संजय ढाके (वय २९, रा. वराडसीम, ता. भुसावळ ) आणि राहूल कारभारी गायकवाड (वर २८, रा. नांदगाव, जिल्हा नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आणले होते. ही माहिती मिळताच सर्वपक्षीय महिलांनी तेथे धाव घेऊन त्या व्यक्तीला चोप देण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला तेथून लागलीच हलविले. दरम्यान, या प्रकरणी महिला संघटनेच्या सदस्यांनी अतिशय तीव्र शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेनेच्या शोभा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी यांच्यासह सर्वपक्षीय महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सरिता माळी म्हणाल्या की, सोशल मीडियातून महिलांची मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात असून यापुढे याला सहन केले जाणार नाही. यासाठी सर्वपक्षीय महिला पदाधिकारी एकत्र आल्या असून असला काही प्रकार आढळून आल्यास संबंधीतांना धडा शिकवला जाईल. तर शोभा चौधरी यांनीही सोशल मीडियातून महिलांवर चिखलफेक करणार्यांना इशारा दिला.
पहा : नेमका काय प्रकार घडला याची माहिती देणारा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/315021566100549