जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रूपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. दोघांच्या गैरसमजूतीतून हा प्रकार झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड व समझोता झाल्यानेर न्यायालयाने दोघांकडून लेखी घेत खटला मागे घेण्यात आला. त्यामुळे अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतल्याने शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलास मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येठ नेते आ. एकनाथ खडसे हे २०१६ मध्ये मंत्री असताना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुद्धा केला होता.
या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात मंगळवारी २७ जून रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्या संदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.