Home Cities चाळीसगाव खेडगाव उपसरपंचपदी श्रीमती विमालबाई साळुंखे बिनविरोध

खेडगाव उपसरपंचपदी श्रीमती विमालबाई साळुंखे बिनविरोध

4b08355d 424a 4544 8995 565a444e23d5
4b08355d 424a 4544 8995 565a444e23d5

4b08355d 424a 4544 8995 565a444e23d5

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव ग्राम पंचायत उपसरपंचपदी श्रीमती विमालबाई जिजाबराव साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गतवर्षी खेडगाव ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध होऊन तालुक्यात आगळा-वेगळा पायंडा पडला होता, त्याचे सम्पूर्ण तालुक्यात कौतूक झाले होते.

 

सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून उपसरपंचपदाचा खांदेपालट प्रतिवर्षी करण्याचे धोरणानुसार यंदाही उपसरपंचपदी श्रीमती विमालबाई साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रसंगी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, आघाडीचे नेते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती विमालबाई ह्या पारोळ्याचे दिवंगत आमदार भास्कर राजाराम पाटील यांच्या भगिनी तर खेडगाव येथील ग.स. सोसायटी शाखाधिकारी भूपेंद्र साळुंखे व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळुंखे यांच्या मातोश्री आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound