अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापन दिन साजरा

1b89c05d 2b35 42ae bf25 ab68db8d3b23
1b89c05d 2b35 42ae bf25 ab68db8d3b23

1b89c05d 2b35 42ae bf25 ab68db8d3b23

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि.१०) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने व पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

तसेच तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनीही प्रत्येक गावात प्रत्येक घरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार पोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. किरण पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष भागवत पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय प्रभाकर पाटील, एल.टी. पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, तालुका युवक अध्यक्ष हर्षल पाटील, शहर युवक अध्यक्ष बाळू पाटील, मा.प. सदस्य संदेश पाटील, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष राहुल गोत्राळ, कैलास पाटील , हर्षल पाटील, रणजीत पाटील, कल्पेश गुजराथी, गौरव पाटील, तेजस वानखेडे, गौरव शिंदे, आर्यन मोरे, भुषण पाटील, नितीन भदाणे, बापू झुलाल पाटील, पंकज पाटील, भैय्यासाहेब पाटील, मनोहर पाटील, दर्पण वाघ, प्रदीप पाटील, भटू पाटील, हिंमत पाटील, अरुण शिंदे, मधुकर पाटील, सारबेटे सरपंच युवराज पाटील, संभाजी पाटील, देविदास देसले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here