अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विश्राम गृहजवळील महाराणा प्रताप चौकात माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतून व नगरपरिषदेच्या सौजन्याने रानाजींचे भव्य व आकर्षक स्मारक साकारण्यात आले आहे. 6 जून रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त या स्मारकाचे थाटात लोकार्पण करण्यात आले. तसेच जयंती देखील वाजतगाजत उत्साहात साजरी करण्यात आली.
अमळनेर तालुका व शहर राजपूत एकता मंचच्या वतीने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या स्मारकाचे लोकार्पण योग प्रचारक तथा सेवानिवृत्त प्रा.धर्मसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, पुण्याचे पोलिस आयुक्त साहेबराव पाटील, माजी सभापती शाम अहिरे, प संदस्य भिकेश पावभा पाटील, मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मुन्ना शर्मा, देखरेख संघाचे चेअरमन विक्रांत पाटील, एस टी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष एल टी पाटील, ऍड तिलोत्तमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनिल भामरे, संजय पाटील, संतोष पाटील, गणेश चौधरी, प्रसाद शर्मा, ऍड विवेक लाठी, सोनार यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला स्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर कार्यकर्त्यानी प्रचंड जल्लोष केला. यांनतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जयंती निमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सर्व समाज बांधव व राणा प्रेमींनी बँड च्या तालावर ठेका धरून रानाजींचा प्रचंड जयघोष केला. दरम्यान, हिंदू सूर्य वीर शिरोमणी राणा प्रताप यांच्या कार्याचे आजच्या व भावी पिढीला स्मरण व्हावे, प्रत्येक युवकाच्या मनात त्यांच्याप्रमाणेच देशभक्तीची भावना जागृत होऊन तो सशक्त आणि बलवान व्हावा यासाठीच माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी हे स्मारक अमळनेर शहराच्या मुख्य रस्त्यावरील प्रमुख चौकात उभारले आहे. या स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यात कमालीची भर देखील पडत आहे. या उल्लेखनीय विकास कामाबद्दल सर्व समाज बांधव व राणा प्रेमींच्या वतीने माजी आ. साहेबराव पाटील, नगराध्यक्षा तसेच पालिकेच्या सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे विशेष आभार यावेळी मानन्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर तालुका राजपुत समाज पंच मंडळाचे अध्यक्ष – रणजित भिमसिंग राजपुत ,उपाध्यक्ष – अनिल भिमसिंग पाटील , अॅड. दिपेन परमार,सचिव – गुलाबसिंग पाटील,सह सचिव – पिन्टू राजपुत,खजिनदार -विजयसिंग राजपुत,कार्यकारी सदस्य – चेतन राजपुत, जयराम पाटील, रामलाल पाटील, राजु परदेशी, भरतसिंग पाटील, राजेंद्र पंडित पाटील, मच्छिंद्र पाटील, अरूण राजाराम पाटील, सुनिल पाटील, राजु लोटन पाटील, डाॅ. ज्ञानेश्वर पाटील, अमोल राजपुत, विलाससिंग राजपुत आदींसह,संजय पाटील,कुणाल गिरासे,जयदीप पवार,अतुल राजपूत,स्वर्णदीप राजपूत,प्रदीप राजपूत,मुकेश राजपूत,प्रकाश भीमसिंग पाटील,ज्ञानेश्वर पाटील यासह युवा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमास भाग्यश्री राजपूत, रुपाली राजपूत, भारती राजपूत, दीपाली राजपूत, पूर्वा राजपूत आदीसह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.