https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/366388007329420
जळगाव प्रतिनिधी । ना. गिरीश महाजन यांची जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच आगमन झाल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे अलीकडेच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. ही घोषणा झाल्यानंतर ना. महाजन हे आज पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. आज दुपारी गितांजली एक्सप्रेसने त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात गिरीशभाऊंचे स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून निघाला.
रेमंड चौफुलीवर माजी महापौर ललीत कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनीही ना. महाजन यांचे जोरदार स्वागत केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/400194357239709/