Home Cities चाळीसगाव धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहिम

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहिम

0
49
dharmadhikari pratishtan project

dharmadhikari pratishtan project

चाळीसगाव प्रतिनिधी । नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या चार कब्रस्थानमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात ५३७ श्री. सदस्य सहभागी झाले होते. चार ठिकाणी सदस्यांची विभागणी करण्यात आली होती. यात धुळे रोडवरील कोतकर कॉलेज समोरील कब्रस्थान, पाटणादेवी रोडवरील रोशनगेट समोरील कब्रस्थान, बामोशी बाबा दर्गा ट्रस्ट मागील कब्रस्थान, चामुंडा माता मंदिर परिसरातील तितुर नदी पात्रातील कब्रस्थान या चार ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छतेसोबत सर्वधर्म समभावातून जातीय सलोख्याचा आगळा वेगळा संदेश यातून दिला आहे.

या उपक्रमाला नगसेवक रविंद्र गिरधर चौधरी, नगरसेवक चिरागोद्दीन शेख, सय्यद सलीम सय्यद अजीज, जब्बार बागवान, अजीज मिर्झा, रसूल शेख, राजू खान, जमिल मुजावर, मूजीब मुजावर आदि उपस्थित होते. स्वच्छता अभियान उपक्रमास मुस्लिम समाज ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांचे सहकार्य लाभले. प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वच्छता अभियानासाठी प्रतिष्ठानचे ५३७ श्री सद्स्य सहभागी झाले होते. यात ग्रामीण भागातील पातोंडा, देवळी, सायगाव, दहिवद, तांबोळे, ढेकू, वाखारी, न्यायडोंगरी, मेहुणबारे, भोरस, मुंदखेडा, रांजणगाव व शहरी भागातील कन्नड, नांदगाव येथील श्री सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी ट्रॅक्टरसह लहान मोठे १४ वाहने उपलब्ध करण्यात आली होती.

या अभियानातुन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३३ टन ५०० किलो सुका व ओला कचरा संकलित केला. तसेच भडगावात १७७ सदस्यांनी ३७ टन, पाचोरा येथे १९० सदस्यांनी १६ टन ५०० किलो पारोळा येथून ११२ सदस्यांनी १२ टन असा एकंदरीत ९९ टन कचरा विभागातुन संकलित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound