ज्ञानदेव नगरातून एकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरातील गीताई ट्रेंडस समोरील मोकळ्या जागेतून एका हातमजूरी करणाऱ्या व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १५ जून रोजी सकाळी १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खेमराम प्रेमचंद जंगले हे आपल्या परिवारासह शहरातील शिव नगरात वास्तव्याला आहे. मंगळवार १३ जून रोजी रात्री ९ वाजता  कामाच्या निमित्ताने खेमराज जंगले हे दुचाकी (एमएच १९ बीएन ५९७९) ने शहरातील ज्ञानदेव नगरातील गीताई ट्रेंडर्स समोर आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खेमराज यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर गुरूवारी १५ जून रोजी सकाळी १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वियज निकम करीत आहे.

Protected Content