बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असलेल्या एका तरुणाचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवार ११ जून रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश जानकीराम चौधरी (वय-२२, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ७ जून रोजी रात्री साडेबारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना चोरट्यांनी घराचा गडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले रोकड व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर आकाश चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ११ जून रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.

Protected Content