वंचित आघाडी काँग्रेससोबत येवून रा.काँ.चे घड्याळ बिघडवणार !

pawar chavan ambedkar

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस, रा.काँ. आघाडीच्या विजयाची समीकरणे बिघडवली. यापासून धडा घेत आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विधान सभेसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत प्रयत्न चालवले आहेत. ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांना असलेला विरोध पाहता काँग्रेस व वंचितने एकत्र यावे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत हे दोघे एकत्र आले तर रा.काँ. चे गणित बिघडणार असल्याची चिन्हे आहेत.

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीमधील मित्रपक्ष स्वबळावर लढले होते. पश्चिम वºहाडात काँग्रेसने तीन जागा, भारिप-बमसंने एक जागा जिंकून आपले अस्तित्व टिकवले; मात्र राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, पंधरा मतदारसंघांपैकी केवळ अकोला पश्चिम या एकमेव मतदारसंघात रा.काँ. ने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. इतर एकाही मतदारसंघात रा.काँ.ला दुसरा क्रमांकही घेता आलेला नाही. ज्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिथे भारिप-बमसं तिसऱ्या क्रमांकावर असून, दोघांच्या मतांमध्ये दोन हजारांचेच अंतर आहे. भारिप-बमसंने सर्वच मतदारसंघांत चांगली मते घेतली असल्याने भारिप व काँग्रेसची ताकद एकत्र आणण्याबाबत पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढता आहे. असे झाल्यास रा.काँ. समोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

Add Comment

Protected Content