सकाळचा भोंगा बंद करा ! : संजय राऊत यांना धमकी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी सकाळी नऊचा भोंगा बंद करावा अन्यथा त्यांना मारून टाकू अशी धमकी आज देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण शांत होत नाही तोच आता शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना देखील धमकावण्यात आले आहे. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून ही धमकी देण्यात आली असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजेचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा धमकीवजा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला असून संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती वारंवार सकाळी नऊ वाजेचा भोंगा बंद करा, अशा इशारा देत होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी अनेकांना अंगावर घेतले असून आधीदेखील त्यांना धमकावण्यात आले होते. यानंतर आता थेट त्यांच्या बंधूंनाच धमकीचा फोन आला.

Protected Content