Home क्राईम जळगावात आढळला प्रौढाचा मृतदेह

जळगावात आढळला प्रौढाचा मृतदेह


suside
 

जळगाव (प्रतिनिधी) औद्योगिक वसाहतीतील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाजवळ एका 52 वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरुण निनाजी घाटे (वय 52, रा.उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा ह.मु. एमआयडीसी जळगाव) हे जगवाणी तेलच्या कंपनीत हमालीचे काम करतात. काल शनिवार असल्याकारणाने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे ते दिवसभर घरी न राहता बाहेर गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने पत्नी व मुलगा यांनी शोधाशोध सुरू केली. परंतु आज रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. घाटे यांचा मृतदेह खाजगी वाहनाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांचा मुलगा अक्षय घाटे हा देखील एका कंपनीत कामाला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा पत्नी व विवाहित मुलगी असा परिवार आहे. मृत्यूबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, अतिमद्य सेवनामुळे घाटे यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound