Home क्राईम भरधाव टँकरने फुटपाथवर झोपलेल्या तीघांना चिरडले

भरधाव टँकरने फुटपाथवर झोपलेल्या तीघांना चिरडले


 

accident
 

मुंबई (वृत्तसंस्था) विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील वीर सावरकर मार्गावरील कैलास कॉम्प्लेक्सजवळ एका भरधाव टँकरने फुटपाथवर झोपलेल्या तीघांना चिरडले आहे. वाहन चालकाचा टँकरवरील नियंत्रन सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

 

श्यामा पवार आणि लक्ष्मी वाघमारे अशी मृत्यू पावलेल्या दोघींची नावे आहेत. तर तीन वर्षांचा कार्तिक वाघमारे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, टँकरचालक फरार असून पोलिसांनी टँकर ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound