वृध्दासह भाडेकरूचे बंद घर फोडून ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वैभव स्टेट बँक कॉलनी परिसरात वृद्धासह भाडेकरूनचे बंद घर फोडून ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत मंगळवारी २३ मे रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर मुरलीधर बागुल (वय-६३, राह. वैभव स्टेट बँक कॉलनी, जळगाव) हे वयोवृत्त आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान खालच्या मजल्यावर रविकुमार मित्तल हे तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत आहे. सुट्ट्या असल्या कारणामुळे रवी कुमार हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शुक्रवार ५ मे रोजी त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते. त्यानंतर बुधवार १० मे रोजी किशोर बागुल हे आपल्या कुटुंबीयांसह चारधाम यात्रेसाठी निघून गेले होते. त्यामुळे दोन्हीही घर बंद होते हीच संधी साधून चोरट्यांनी दोन्ही बंद घर फोडून घरातून टीव्ही रोकड, सोन्या-चांदीच्या मुर्त्या आणि दागिने असा एकूण ५७ हजार ५०० रूपये किंमतीची किमतीचा ऐवज चोरून नेला मंगळवार २३ मे रोजी विठ्ठल कुटुंबीय आणि बागल कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहणे केले असता घरातील सामानांची सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

Protected Content