Home क्राईम बेडरूमची खिडकी तोडून घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

बेडरूमची खिडकी तोडून घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेडरूममधील खिडकी तोडून आत प्रवेश करत कपाटातून सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना भुसावळ शहरातील शांती नगरात घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माधुरी हरिश्चंद्र बढे (वय-७१, रा. शांतीनगर भुसावळ) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ मे रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा बेडरूमच्या खिडकी तोडून आत प्रवेश करत गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने बुधवारी १७ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.


Protected Content

Play sound