Home क्राईम कार-दुचाकीच्या अपघातात तरुण जखमी; कार चालक फरार

कार-दुचाकीच्या अपघातात तरुण जखमी; कार चालक फरार


accident5 201905244186
accident5 201905244186

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एका कारने दुचाकीला धडक दुचाकी डिव्हायडवर जाऊन आदळल्याने तरुण जखमी झाला. तसेच अपघात करून कार चालक कार सोडून फरार झाला आहे. तर कार शहर पोलीसात जमा करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीत सुप्रीम कॉलनीतील रहिवाशी आसिफ खान हे दुचाकीने जिल्हा परिषदेकडून आपल्या घरी जात असताना टॉवर चौकाच्या अलीकडे कार क्रमांक (एमएच 30 एझेड 583) ने मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील आसिफ खान हे जखमी झाले. या घटनेनंतर कारचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पोलीसांनी पाठलाग केला. दरम्यान कार चालकाने कार सोडून हाबर्डीकर ब्रेकरीजवळून पळ काढला. वाहतून पोलीस कर्मचारी रफिक शेख, अनिल सोनवणे आणि ट्राफिक वार्डन संजय महाजन यांनी कारला शहर पोलीस ठाण्यात आणले. तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound