एरंडोल (प्रतिनिधी) । एरंडोल तालुक्यातील पिंप्री येथे राष्ट्रीय सेवा संघ आणि लोकसहभागातून पाझर तलावाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सहा लाखचे काम केवळ चार लाखात पुर्ण केल्याने सर्वत्र कामाचे कौतूक होत आहे.
पिंप्री बुद्रुक गावाच्या हद्दीत असलेल्या एका पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी साधारणपणे सहा लाख रूपये खर्च अपेक्षित होता. 55 बाय 55 मीटर खोली, 2 मीटर आकाराचे 125 मीटर लांबीचा बांध केवळ 4 लाख रूपयांत 10 दिवसात पुर्ण झाल्याने या कामाचे कौतूक होत आहे. या कामासाठी पिंप्री गावातील दिड लाख रूपये आणि राष्ट्रीय सेवा संघाने दिलेली रक्कमेत या कामाचे काम पुर्ण करण्यात आले. गावातील नागरीक, तरूण, महिला, मजुर, तांत्रिक सहाय्यक अभियंता आर.एस.महाजन, ईश्वर बंडू पाटील यांच्यासह आदींचे पाठबळ मिळाले होते.