अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील व काही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनी (ता.६ जून) कुलगुरू डॉ. पाटील व त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे बंधू प्रा. सुनील पाटील हे सपत्नीक श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे दर्शनास आले होते. त्यांच्या समवेत प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी व त्यांच्या पत्नी आशालता चौधरी व प्रा. डॉ. धिरज वैष्णव हे देखील उपस्थित होते. या सर्वाच्या हस्ते श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. आगामी काळात शिक्षण, शेतकरी, आरोग्य व पर्यावरण या विषयांवर मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे कोणकोणते महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जाणार आहेत, याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी दिली. कुलगुरू डॉ.पाटील यांनी मंदिरातील स्वच्छता व नियोजन बद्धता याबद्दल खुप कौतूक केले. यावेळी संस्थेचे खजिनदार गिरीष कुलकर्णी व सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ अनिल अहिरराव उपस्थित होते.