Home राजकीय संजय राऊत म्हणजे शकुनीमामा; ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांनाही अडचणीत आणले !

संजय राऊत म्हणजे शकुनीमामा; ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांनाही अडचणीत आणले !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टिका करतांना त्यांना शकुनीमामा म्हटले आहे.

 

काल खासदार शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे सांगताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहास देखील उधाण आल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करतांना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.

 

राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे कुटुंबात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता हाच प्रकार पवार कुटुंबातही होत असून यासाठी राऊतच जबाबदार आहेत. राऊत हा माणूस घरात घेऊन जाण्याच्या लायकीचा नाही. याच माणसाने मोहित कंबोज यांच्या हॉटेलचे प्रकरण नाहक उकरून काढले. यामुळे कंबोज हे आदित्य वा तेजस ठाकरे यांच्या हॉटेल लाईफ बाबत बोलतील हे त्याला माहित होते. ठाकरे कुटुंब अडचणीत यावे याचसाठी त्याने हा प्रकार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी याप्रसंगी केला.


Protected Content

Play sound