जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या भिलाटी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात गुरुवार २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शोएब शेख अमन शेख (वय-२३) रा. भिलाटी, तांबापुर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून आहे. दरम्यान २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शेएब हा अंगणात उभा असतांना काय झाले असे विचारणा केल्याचा रागातून मनोज गायकवाड, मुकेश हटकर, गौरी हटकर सर्व रा. भिलाटी परिसर, तंबाखू, जळगाव यांनी बेदम मारहाण केली. तसेच पाठीवर कुंडी मारून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.