Home क्राईम किक्रेट खेळण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

किक्रेट खेळण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील मैदानावर किक्रेट खेळण्याच्या वादातून तरुणाला दोन जणंनी लाकडी काठी तसेच चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे लोकेश संभाजी शिंपी वय १९ हा तरुण राहतो. रविवार २३ एप्रिल रोजी लोकेश हा त्याच्या मित्रांसह शिवकॉलनी परिसरातील मारुती पार्कच्या समोरील मैदानावर क्रिकेट खेळत होता. यादरम्यान या मैदानावर मोहित साळुंखे, राज जगताप असे दोन जण आले, त्यांना लोकेश हा आमची मॅच संपली की तुम्ही पुढची मॅच खेळा असे बोलला असता, त्याचा राग आल्याने दोघांनी लोकेश शिंपी यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, यात एकाने लाकडी काठीने लोकेशच्या उजव्या डोळ्याजवळ मारहाण करुन दुखापत केली, याप्रकरणी लोकेश याने दुसऱ्या दिवशी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन मोहित साळुंखे, राज जगताप दोघे रा. शिवकॉलनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound