Home क्राईम दुचाकी अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी

दुचाकी अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी

0
48


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप कोळी रा. पांडूरंग टॉकीज, भुसावळ हे आपल्या पत्नी रेखा कोळी यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवार १९ एप्रिल रोजी सकाळी १० प्रदीप कोळी हे पत्नी रेखा कोळी यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ बीएच ९७६७) ने जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळून जात होते. त्याचवेळी समोरून अज्ञात दुचाकीधारकाने परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून प्रदीप कोळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कोळी दाम्पत्य हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी रेखा प्रदीप कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.


Protected Content

Play sound