जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठातापदी प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, प्राचार्य डॉ. अशोक खैरनार आणि डॉ. साहेबराव भुकन यांचे नामांकन करण्यात आले आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रभारी अधिष्ठात्यांचे नामांकन जाहीर केले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत (किसान विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर), मानव्यविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य डॉ. अशोक खैरनार (आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे) तसेच आंतर विषय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. साहेबराव भुकन (साने गुरूजी विद्या प्रबोधिनी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा) यांचे नामांकन करण्यात आले आहे.