Home Cities यावल यावल येथील पटेल स्कुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यावल येथील पटेल स्कुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांची १३२वी जयंती निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलच्या सभागृहात आयोजीत जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्कुलचे शिक्षक मिलिंद भालेराव व शिला तायडे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत त्रिवार अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रशांत फेगडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात जयंतीचा कार्यक्रम पार पडला.


Protected Content

Play sound