जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महात्मा ज्योतीराव फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) श्रीमती शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, तहसिलदार पंकज लोखंडे, स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा, नायब तहसीलदार अमित भोईटे, अव्वल कारकून गणेश साळी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.