Home क्राईम आमोदा बुद्रुक गावातून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

आमोदा बुद्रुक गावातून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आमोदा बुद्रुक गावातून एका तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर नाना ठाकरे (वय-२५) रा. आमोदा बुद्रुक ता.जि.जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवार ५ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ सीक्यू १६२९) ही गावातील मारुती मंदिराजवळ पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार घडल्यानंतर सागर ठाकरे याने आपल्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर सोमवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound