Home क्राईम सुयोग हॉटेल जवळून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली

सुयोग हॉटेल जवळून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भजे गल्लीतील असलेल्या हॉटेल सुयोग समोरून एका व्यापाऱ्याची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप वसंत जोशी (वय-४९) रा. श्रीधर नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ते दुचाकी (एमएच १९ डीएफ ९७०) ने भजे गल्लीतील हॉटेल सुयोग येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी रोडवर पार्किंग करून लावली होती. जेवण करून परत आल्यावर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला, कुठेही दुचाकी मिळून न आल्याने अखेर सोमवारी ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound