अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी फरार तरुणास अटक

images
images

images

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील धनाजी काळे नगरातील एका तरुणाने त्याच कॉलनीतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपी तरुणास जिल्हापेठ पोलिसांनी काल रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी प्रमोद प्रभाकर सोनवणे (वय-२४) रा. धनाजी काळे नगर याने आपल्याच गल्लीतील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १७८/१८ विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान संशयित आरोपी प्रमोद याने पीडित मुलीला शिर्डी, कल्याण व मुंबई या ठिकाणी नेऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडित मुलीने आपल्या जवाबात म्हटले होते.प्रमोदच्या विरोधात लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पीएसआय जगदीश मोरे, योगेश सपकाळे, गणेश शिरसाळे, रमेश ठाकूर व योगेश सावळे यांनी काळ रात्री त्याला अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here