चाळीसगावात घरफोडी; एका लाखाची रोकड लंपास

c4e4c972 92e9 4f37 8b64 1c8c79cddc4a
c4e4c972 92e9 4f37 8b64 1c8c79cddc4a

c4e4c972 92e9 4f37 8b64 1c8c79cddc4a
 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिका मंगल कार्यालय भागात घरफोडी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल एक लाखाची रोकड लंपास केलीय.

 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जहिरोद्दीन सिराजुद्दीन शेख (रा.जी के आबा मळा कादरी नगर) हे ईद साजरी करण्यासाठी आपल्या जुन्या घरी वडिलांकडे गेले होते. त्यामुळे घर बंद होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कंपाउंड व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील एक लाख रुपये रोख चोरून नेले. ही घटना दिनांक सहा जून रोजी रात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान घडली असल्याचे समजते. शेख जहिरोद्दीन यांनी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर शेख कलीम यांना 2 लाख रुपये घेऊन ताबेगहाण दिला होता. याची रक्कम 1 लाख रोख व 1 लाखांचा चेक त्यांना मिळाल्याने लाख रुपये रोख ऐवज त्यांच्या घरात होता, असे त्यांनी पोलिसात फिर्याद देतांना सांगितले आहे. हीच रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत चाळीसगाव पोलिसात 457/ 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here